व्यापारी म्हणतात, डाळ जैसे थे !

By Admin | Published: July 22, 2016 12:39 AM2016-07-22T00:39:31+5:302016-07-22T00:42:10+5:30

ग्राहक मेटाकुटीला : अन्यत्र दर घटले; बाजारात कायम

The trader says, like pulses! | व्यापारी म्हणतात, डाळ जैसे थे !

व्यापारी म्हणतात, डाळ जैसे थे !

googlenewsNext

 नाशिक : एकीकडे मॉल्समध्ये व अन्य ठिकाणी तूरडाळीचे दर घसरले असताना, शहरातील व्यापाऱ्यांकडे मात्र १३० ते १४० रुपये प्रतिकिलोचा दर कायम आहे. तूरडाळीचे दर एवढ्यात घटलेले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे.
गेल्या आॅगस्ट महिन्यानंतर तूरडाळीचे दर भडकण्यास सुरुवात झाली. दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी यामुळे गेल्या वर्षी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दररोज लागणाऱ्या तूरडाळीचे दर तब्बल दोनशे रुपयांपर्यंत वधारले. या मुद्द्यावरून बरेच राजकारणही तापले.
गेल्या वर्षीची दिवाळी नागरिकांना महागाईच्या सावटाखालीच साजरी करावी लागली. त्यानंतर नवी तूरडाळ येताच जानेवारीनंतर हळूहळू दर घटण्यास सुरुवात होऊन डाळ १४० रुपये प्रतिकिलोपर्यंत स्थिरावली; मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून पुन्हा डाळ भडकू लागल्याने राज्य सरकारने डाळ दर नियंत्रण कायदा मंजूर करीत साठेबाजी व दरवाढीला
चाप लावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही डाळीच्या किमती आणखी उतरू शकल्या नाहीत.
दरम्यान, सध्या मॉल्समध्ये तूरडाळ शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत उपलब्ध झाली असताना, शहरातील व्यापाऱ्यांनी मात्र तूरडाळीचे दर घटले नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मोठ्या उद्योजकांनी साठेबाजी करून ठेवल्याने त्यांना कमी किमतीत डाळ विकण्यास परवडत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या शहरात १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दरानेच डाळ उपलब्ध होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The trader says, like pulses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.