व्यापारी शेतात जाऊन करणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:20 PM2020-04-17T20:20:19+5:302020-04-18T00:29:43+5:30
लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने दि. ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयाने आता नवीन गाइडलाइन येणार असून, त्यात खास करून शेतकरी वर्गाच्या शेतमाल विक्र ीसाठी कशा प्रकारची व्यवस्था असावी, या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
सदर बैठकीत प्रामुख्याने त्या-त्या तालुक्यातील बाजार समित्यांनी तेथील व्यापारी वर्गास बाजार समित्यांच्या अटी-शर्ती व शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच शेतमाल खरेदी-विक्री करता येणार आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, परंतु अशाप्रकारे खरेदी केलेल्या मालाची व्यापारी वर्गास अधिकृत काटापट्टी व हिशेबपट्टी संबंधित शेतकºयांना द्यावी लागणार असून, सदर व्यापाºयाने दररोज किती माल खरेदी केला याची रजिस्टरवर नोंद करून ती माहिती बाजार समितीस देणे बंधनकारक असणार आहे. याकामी बाजार समित्यांच्या वतीने हेल्पलाइन नंबर दिला जाणार असून, शेतकºयांना माल विक्री संदर्भात काही अडचणी आल्यास त्याची त्वरित दखल घेतली जाणार आहे.
सदर बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, सटाणा बाजार समितीचे सभापती संजय पाटील, मनमाड बाजार समितीचे सभापती किशोर लहाने, कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, उमराणा बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, लासलगाव बाजार समितीचे सहायक सचिव सुदीन टर्ले आदी उपस्थित होते.