महालक्ष्मी यात्रेची परंपरा यंदाही खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:31+5:302021-05-16T04:14:31+5:30
शुक्रवारी सकाळी श्री महालक्ष्मी माता मूर्तीसह ग्रामदैवतांचे मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करून विधीवत महापूजन करण्यात आले. दरवर्षी ...
शुक्रवारी सकाळी श्री महालक्ष्मी माता मूर्तीसह ग्रामदैवतांचे मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करून विधीवत महापूजन करण्यात आले.
दरवर्षी यात्रा उत्सवात होणारे भरगच्च धार्मिक व मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमीवर म्हसरुळ ग्रामस्थांकडून रद्द करण्यात आले. म्हसरुळला दरवर्षी ग्रामस्थांतर्फे अक्षय तृतीयानिमित्त ग्रामदैवत महालक्ष्मी माता यात्रा विविध धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमांनी साजरा केला जातो. गेल्या वर्षापासून देशभरात कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येऊन सर्व धार्मिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी म्हसरुळ ग्रामस्थांनी यंदा उत्सव साजरा केला नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पूजाविधी खंडित राहू नये म्हणून अक्षय तृतीयेला योगेश मोराडे, रूंजाजी मोराडे, वाळू शिंदे, रघुनाथ गुंजाळ, प्रकाश उखाडे, वाल्मिकी शिंदे, पंडित खाडे, शांताराम पोटींदे यांच्या हस्ते ग्रामदैवत बारागाड्या महालक्ष्मी माता रथाचे पूजन करण्यात येऊन देशातील कोरोना संकट नष्ट व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली.