मालेगावी दिवाळी पर्वात किल्ले बनविण्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:13 AM2018-11-08T00:13:08+5:302018-11-08T00:18:00+5:30

संगमेश्वर : दीपावली पर्वात भावी पिढीला प्रेरणादायक ठरणारे किल्ले तयार करण्याची परंपरा मालेगाव परिसरातही आता रुजू लागली आहे. पुढील वर्षी याचे मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचा संकल्प येथे सोडण्यात आला आहे.

Tradition for making fort forts in Malegaon Diwali | मालेगावी दिवाळी पर्वात किल्ले बनविण्याची परंपरा

मालेगावी दिवाळी पर्वात किल्ले बनविण्याची परंपरा

Next
ठळक मुद्देशौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भावी पिढीला प्रेरणा देतील.

संगमेश्वर : दीपावली पर्वात भावी पिढीला प्रेरणादायक ठरणारे किल्ले तयार करण्याची परंपरा मालेगाव परिसरातही आता रुजू लागली आहे. पुढील वर्षी याचे मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचा संकल्प येथे सोडण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्टÑात दीपावली सणात घरोघरी मातीचे किल्ले गेल्या अनेक वर्षांपासून तयार केले जातात. पुण्यासह अनेक ठिकाणी खास स्पर्धा घेतली जाते. मराठीवासीयांचे आराध्य- दैवत असलेले व स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहे. त्यांनी महाराष्टÑाला अनेक किल्ल्यांची, गडाची बांधणी केली. भावी पिढीला याचा आदर्श राहावा म्हणून सण-उत्सव काळात मातीचे किल्ले बच्चे कंपनीबरोबरच ज्येष्ठही सहभागी होतात. मालेगाव परिसरातही ही प्रथा रुजू पहात आहे. मालेगावी सोयगाव नववसाहत, कॅम्पातील महाराष्टÑ कॉलनी, गणेशवाडी, शिवाजी वाडी, गवळीवाडा आदी भागातील नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात किल्ले बनविण्याचा आनंद घेतला आहे. लहान मुलेही यात सहभागी झाल्याचे दिसून आले. पुणे परिसरातून आणलेले मावळे, सैनिक, छत्रपती शिवाजी महाराज आदींचे छोटे पुतळे व भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भावी पिढीला प्रेरणा देतील. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन कौतुक केले आहे. त्याच्या माध्यमातून या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आहे.
- अरविंद पवार (उद्योजक) सोयगाव नववसाहत, मालेगाव

Web Title: Tradition for making fort forts in Malegaon Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.