दरीत चैत्रोत्सव यात्रेची पारंपरिक नृत्याने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:47 AM2019-04-24T00:47:19+5:302019-04-24T00:47:45+5:30

दरी गावात चैत्रोत्सव यात्रेची बोहाडा व पारंपरिक नृत्याने सांगता झाली. दरी आई माता मंदिरात पूजा, होमहवन होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

 The traditional dance form of Chaitrotsav Yatra shows in the valley | दरीत चैत्रोत्सव यात्रेची पारंपरिक नृत्याने सांगता

दरीत चैत्रोत्सव यात्रेची पारंपरिक नृत्याने सांगता

Next

मातोरी : दरी गावात चैत्रोत्सव यात्रेची बोहाडा व पारंपरिक नृत्याने सांगता झाली. दरी आई माता मंदिरात पूजा, होमहवन होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
दरी आई माता मंदिरात गेल्या दीडशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा जतन करत आजही दरी गावातून नैवेद्य दिला जातो. यात्रेचे जोरदारपणे आयोजन करत सर्व गावकरी हेवेदावे विसरून यात्रेत एकत्र येतात. गावातील बोहाडा, नृत्य यात्रेला आलेल्या भाविकांचे आकर्षण ठरले. यात्रेच्या दिवशी रात्रभर देवीचे गायन करून जागर झाला. तर दुसऱ्या दिवशी बोहाडा, देवीच्या रथाची गावातून मिरवणूक काढून सांगता करण्यात आली.  यावेळी यात्रेचे नियोजन गावातील यात्रा समिती अध्यक्ष आकाश पिंगळे, आनंद ढेरिंगे, अर्जुन भोई, सीताराम गोडे, ज्ञानेश्वर दिवे, किशोर भोई, बुधा गांगुर्डे, राजेंद्र आचारी, योगेश गोडे, लखन गोडे, किरण वायकांडे, जीवन दोंदे, आनंद लिलके, गणेश बोंबले आदींसह ग्रामस्थांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  The traditional dance form of Chaitrotsav Yatra shows in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.