पारंपरिक घराण्यांनी राखली ‘इभ्रत’
By admin | Published: May 27, 2017 01:07 AM2017-05-27T01:07:46+5:302017-05-27T01:07:57+5:30
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेत मतदारांनी घराणेशाहीला पसंती दिली असल्याची निकालावरून स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेत मतदारांनी घराणेशाहीला पसंती दिली असल्याची निकालावरून स्पष्ट होत आहे. विविध पारंपरिक घराण्यातील अनेक सदस्यांनी एकाचवेळी निवडणूक लढविली होती. यात अनेक घराण्यांना यश मिळाले आहे.
गेले ५ दशके मालेगावचे राजकारण फिरविणाऱ्या निहाल अहमद यांच्या परिवारातील त्यांचे चिरंजीव व जदचे बुलंद एकबाल पुन्हा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे निहालभार्इंचे मोठे चिरंजीव इस्तिहाक अहदम यांनी पराभवाचे धनी व्हावे लागले. निहालभार्इंच्या कन्या शान-ए-हिंद यांनीही विजय मिळविला आहे. गत २०१२च्या निवडणुकीत त्यांनी पराभवास सामोरे जावे लागले होते. मागील पराभवाचा वचपा त्यांनी काढला आहे. निहालभार्इंचे पुतणे अतिक कमाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. निहालभार्इंचे चिरंजीव, कन्या व पुतणे या तिघांना यश मिळाले आहे.
विद्यमान स्थायी समिती सभापती एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मीनबानो एजाज बेग प्रभाग क्रमांक १६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा विजयी झाले आहेत. हे जोडपे पुन्हा महापालिकेत दिसणार आहेत.