आधुनिक युगातही पारंपारिक वाद्य ठिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 07:48 PM2019-03-21T19:48:46+5:302019-03-21T19:49:13+5:30
खामखेडा : आधुनिक युगातही पारंपारिक वाद्याला मोठया प्रमाणात मागणी आसल्याचे दिसून येत आहे.लग्न समारंभ असो की, कुठलाही समारंभ यासाठी आधुनिक युगातील नवनवीन वाद्य वाजवुन आनंद व्यक्त केला जातो. यात बॅण्ड पथक, बोंजो, डी. जे. याचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. मात्र यंदाच्या लग्न सराईत पारपांरिक आदिवासीचे ढोलपाई, साबळ हे वाघ्यास बऱ्याच वर्षातून लग्न समारंभामघ्ये दिसून आले.

विविध जाती-धर्माच्या विधी नुसार लग्न समारंभ पार पाडण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यात पूर्वी त्याच्या रितिरिवाजानुसार लग्नसोहळयात परंपरेनुसार लोकनृत्य अथवा वाद्य वाजविले जात असे.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग झापाटयाने प्रगती झाल्याने, आत्याधुनिक संगीतसाधने व गायक सिस्टिम बॉन्ड पार्टीला मोठया प्रमाणात मागणी आहे. या बॉन्ड पार्टीत अत्याआधुनिक म्युझिक सिस्टिमबरोबर आॅरगन, पँड, ड्रम, कॅसीओ, ढोल, आपढोल, बँजो, टाइमढाल, खुळखुळा, झाज, मोठमोठे, साउंड आदी साधनसामग्री असते.
बॉण्ड पथक किवा डी. जे. जरी तरु ण मंडळी नाचत असली तरी वयस्कर मंडळी व काही हौशी मंडळी मात्र साबळ किवा पावरी याच्या ठेक्यावर आजही नाचताना दिसून येतात. एकीकडे महागडी वाद्य लावून मुलामुलीचे विवाह लावले जात आहेत. यात हजारो रु पयांचा चुरडा होताना दिसत आहे. काही जण कर्ज काढून या सर्व गोष्टी करतात. परंतु कही लोक लोकांमध्ये लुप्त होत चललेली पारंपारिक पुरातन वाद्य लग्न समारंभात पारंपारिक वाद्याची जनजागृती होवी म्हणून पारंपारिक वाद्याकडे वळत आहे.
पूर्वी आदिवासी बांधवाच्या लग्नामघ्ये किवा डोगऱ्या देव उत्साहात पावरी, ढोलपाई ही वाद्ये प्रमुख्याने राहात असे. सध्या भिल्ल आदिवासी लोकाच्या डोगºयादेव उत्सव सुरु असल्याने या पावरी वाद्याचा सुरेख मंजूळ आवाज कानाला ऐकताना गोड लागतो. या पावरी वाद्याच्या तालावर आतिशय सुरेख अशा तालबद्ध ठेक्यावर डोगºया देव उत्सत्वात सामिल झालेले बालवृद्ध लयबद्ध नाचताना दिसून येतात. पावरी या वाद्यांचा आवाज अतिशय मंजूळ आणि लयबद्ध, ऐकायला कानाला गोड वाटतो. आजही डोगºया देव पावरी वाद्याशिवाय साजरा केला जात नाही.
(फोटो २१ ढोलपाई)