नांदूरवैद्य मंदिरात पारंपरिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:29+5:302021-07-20T04:11:29+5:30
सन १९६१ - ६२ या काळात प्रसिद्ध दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांनी इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे झालेल्या 'गंगा जमुना' या ...
सन १९६१ - ६२ या काळात प्रसिद्ध दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांनी इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे झालेल्या 'गंगा जमुना' या चित्रपटाचे चित्रिकरण संपल्यानंतर सदर विठ्ठल रखुमाई मंदिराचे बांधकाम करून दिले होते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरात नांदूरवैद्य येथील भजनी मंडळाच्या वतीने दैनंदिन काकडा भजन करण्यात येते. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार असून, विधीवत पूजन करून दहा भजनी मंडळांच्या वतीने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. (१९ नांदूरवैद्य विठ्ठल)
190721\19nsk_10_19072021_13.jpg
१९ नांदूरवैद्य विठ्ठल