बिटको चौकातील वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:59+5:302020-12-25T04:12:59+5:30

रस्त्यावरील पार्किंगमुळे अडथळा : नाशिकरोडमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले रेजिमेंटल चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी रस्त्यापर्यंत वाहन ...

Traffic at Bitco Chowk disrupted | बिटको चौकातील वाहतूक विस्कळीत

बिटको चौकातील वाहतूक विस्कळीत

Next

रस्त्यावरील पार्किंगमुळे अडथळा : नाशिकरोडमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले रेजिमेंटल चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी रस्त्यापर्यंत वाहन पार्किंग केले जात असल्याने अन्य वाहनधारकांना अडचण होते. गायकवाड मळा रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. या मार्गावरही वाहनांचे अनाधिकृत पार्किंग केले जात आहे.

शिंदे, पळसे परिसरात घबराट

नाशिक: नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे, पळसे परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भागात बिबटे तसेच त्यांचे बछडेदेखील आढळत असल्यामुळे बिबट्याचा मुक्काम वाढल्याचे बोलले जात आहे. बिबट जनावरांवर हल्ले करीत असल्याने नागरिकांनी घराला जाळ्या बसवून घेतल्या आहेत.

बाजारात वाढली भाज्यांची आवक

नाशिक: घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी दरात भाजीपाला मिळत आहे. भाजी बाजारामध्ये सर्वच प्रकारच्या भाज्या आता स्वस्त झाल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे.

वाघ महाविद्यालयात गणित दिन

नाशिक: के.के. वाघ शिक्षणसंस्थेच्या अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन सस्थेच्या विज्ञान व गणित विभागातर्फे भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्या प्रतिष्ठान, बारामती संचलित कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. एप.पी. हिवरेकर यांचे व्याख्यान झाले.

रस्त्यावरील भाजीबार वाढला

नाशिक: म्हसरुळ-मखमबलाबाद लिंकरोडवर भाजीबाजार दिवसेंदिवस वाढत आहे. या परिरसरात निर्माण झालेल्या नववसाहतीमुळे येथील भाजी बाजार बहरला आहे. येथील नागरिकांना शहरात येण्यापेक्षा स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत आहे.

Web Title: Traffic at Bitco Chowk disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.