वाहतूक शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:03 AM2017-08-23T00:03:41+5:302017-08-23T00:03:56+5:30
नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
सिडको : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील अपघातांचे वाढते प्रमाणावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून सिडकोतील त्रिमूर्ती चौक दिव्या अॅडलॅब, पाथर्डी फाटा, अंबड औद्योगिक वसाहत यांसह परिसरात विनाहेल्मेट व सीटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, तसेच सीटबेल्ट न लावणाºया चारचाकी वाहनधारकांवर तसेच कागदपत्रांची पूर्तता नसणाºया शेकडो वाहनधारकांना पकडण्यात येऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वापरण्याबाबत सूचना तसेच प्रबोधन करण्यात येत असल्याने अनेक वाहनधारक आता हेल्मेटचा वापर करीत असल्याचे दिसून येत असले तरी अजूनही अनेक वाहनधारक हे विनाहेल्मेट दुचाकी चालवित असल्याने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. याबरोबरच दिव्या अॅडलॅब परिसरासह मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणाºयांची वाहनेदेखील वाहतूक शाखेच्या गाडीत नेत त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सुजाण नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात येत असून, अपघाताला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतूक शाखेचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.