साळबारीत रस्ता खचल्याने वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:15 PM2019-09-28T17:15:45+5:302019-09-28T17:15:57+5:30
कळवण :- तालुक्यातील दरेगाववणी ते बिलवाडी सहा कि.मी अंतर असलेल्या रस्त्यावरील साळबारीतील मोरीलगतचा रस्ता खचल्याने गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
कळवण :- तालुक्यातील दरेगाववणी ते बिलवाडी सहा कि.मी अंतर असलेल्या रस्त्यावरील साळबारीतील मोरीलगतचा रस्ता खचल्याने गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे बिलवाडी परिसरातील देवळीवणी,जामलेवणी, चिंचपाडा,बोरदैवत,ओझर आदी गावातील वाहनधारकांना वणी,पिंपळगाव व नाशिककडे जाण्यासाठी अभोणा मार्गे सुमारे २५ कि.मी अंतरचा फेरफटका मारावा लागत आहे. तरी हा रस्ता तातडीने दुरु स्त करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांनी व आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
बिलवाडी परिसरातील सात, आठ गावांना वणी, पिंपळगाव, नाशिक मार्केटला आपला शेतीमाल घेउन जाण्यास हा रस्ता अतिशय जवळचा व सोयीचा आहे.परंतु मुसळधार पाऊस व डोंगर उतारावरु न पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता काही ठिकाणी खचला असून दरड कोसळण्यास सुरु वात झाली आहे.त्यामुळे हा रस्ता जितका सोयीचा तितकाच जिवघेणा ठरू पहात आहे. हा रस्ता दुरु स्त करावा अशी मागणी कळवण पंचायत समितीचे सभापती जगन साबळे व बाजार समिती संचालक डी एम गायकवाड व परिसरातील शेतकरी, वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.