बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

By admin | Published: November 17, 2016 10:38 PM2016-11-17T22:38:40+5:302016-11-17T22:36:38+5:30

बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

Traffic collision with banks' crowd | बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

बॅँकांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

Next

 मालेगाव : वाहनांमुळे आले परिसराला यात्रेचे स्वरूपमालेगाव कॅम्प : केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या चलनी नोटा बंद केल्याने आपल्याजवळील नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी अनेक बॅँकामध्ये गर्दी केली आहे. गर्दीमुळे बॅँक परिसरातील भागात वाहतूक कोंडी होत आहे, तर नागरिकांच्या वाहनांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मनस्ताप होत आहे. या गर्दीचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.
शहरात जुन्या नोटा बदलण्यासाठी शहरवासीयांची झुंबड उडाली आहे. दररोज बॅँकांमध्ये गर्दी वाढत आहे. शासनातर्फे पुन्हा पुन्हा यासाठी मुदतवाढ मिळत असल्याने नागरिक दररोज नवीन नवीन बॅँका नोटाबदल करण्यासाठी भटकंती करीत आहे.
शहरातील मामलेदार गल्लीमधील सेंट्रल बॅँक, मामको बॅँक येथे सकाळपासून रांगा लागत आहे. येथे गर्दीमुळे गल्ली अरुंद पडत आहे तर या ठिकाणी मामलेदार गल्ली व नेहरू चौक येथे वाहतूक अडवण्यात आली आहे. बॅँकेच्या कामकाज वेळेत लोखंडी जाळ्या लावून मोठ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच पेरी चौकातील मामको मुख्य कार्यालयात गर्दीमुळे किदवाई व मोहंमदअली रोडवर वाहतुकीचा परिणाम दिसून आला आहे.
मुख्य टपाल कार्यालय, सटाणा रस्त्यावरील राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये गर्दीमुळे वाहतूक खोळंबा होताना दिसून येत आहे. शहरातील मुख्यत्वे स्टेट बॅँकेत दररोज हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. या नागरिकांनी आणलेली वाहने बेशिस्तपणे रस्त्यांवर उभे केली, यामुळे नागरिकांची गर्दी व शेकडो वाहनांची गर्दी यामुळे स्टेट बॅँक चौक दिवसभर गर्दीत हरवला आहे. येथे नागरिक व वाहनांची गर्दी कमी करण्याचे नियोजन वेळोवेळी ढासळत आहे. यामुळे येथे वादाचे प्रसंग घडत आहेत. स्टेट बॅँक चौक मागील जैन मंदिर व इतर रहिवासी वस्तीतील नागरिकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत नोटा बदल करण्यासाठी अवधी मिळत असल्याने वाहतुकीचा त्रास सर्वसामान्यांना व स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागेल, असे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Traffic collision with banks' crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.