इंदिरानगरला वाहतूक कोंडीचे जंक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:00 AM2020-01-28T00:00:03+5:302020-01-28T00:16:40+5:30

एका बाजूला नाशिक-पुणे रोड व दुसऱ्या बाजूला नाशिक-मुंबई महामार्ग अशा अत्यंत रहदारीच्या दोन मार्गाला जोडणाºया इंदिरानगर व परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागला आहे. अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांचा विचार करता या भागात रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

Traffic congestion junction to Indiranagar! | इंदिरानगरला वाहतूक कोंडीचे जंक्शन !

इंदिरानगरला वाहतूक कोंडीचे जंक्शन !

Next
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : अरुंद रस्ते, रस्त्यांवर वाढते अतिक्रमण

इंदिरानगर : एका बाजूला नाशिक-पुणे रोड व दुसऱ्या बाजूला नाशिक-मुंबई महामार्ग अशा अत्यंत रहदारीच्या दोन मार्गाला जोडणाºया इंदिरानगर व परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागला आहे. अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांचा विचार करता या भागात रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
वडाळ-पाथर्डी रस्ता लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना अडथळा ठरणारे पत्र्याचे शेड व पक्के बांधकामाचे ओटे अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढले होते. परंतु त्यांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाली आहे. व्यावसायिकांकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने वाहतुकीस रस्ता अपुरा पडतो आणि वाहतुकीची कोंडी होत असते. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, पांडव नगरी, समर्थनगर, सराफनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे परिसरातील बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा उपयोग करतात.
अंबड औद्योगिक वसाहत आणि देवळाली कॅम्पला जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते तसेच या रस्त्यालगतच प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालये असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. सार्थकनगर बस थांब्यासमोरच विद्यालय आहे. या ठिकाणी सकाळी आठ, अकरा आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाºया पालकांच्या शेकडो दुचाकी आणि सुमारे पन्नास ते साठ व्हॅन रस्त्यावरच लावली जातात.
नासर्डी नदी पूल ते सह्याद्री हॉस्पिटल सिग्नल, वडाळा- पाथर्डी रस्त्यादरम्यान अनेक दिवसांपासून नादुरुस्त वाहने पडून आहेत. त्यामुळे शंभर फुटी रस्ता वाहतुकीसाठी अरुंद पडत असून, वाहतूक कोंडी जणूकाही सूत्रच बनले आहे. तसेच परिसरात कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त होत चालल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी महामार्गास दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आले. या उपनगरातील नागरिक समांतर रस्त्याचा वापर करतात याच रस्त्यावरून घंटागाड्या खतप्रकल्पात जातात. घंटागाड्या भंगार विक्रीसाठी समांतर रस्त्यावरील भगतसिंग वसाहतीतील भंगार विक्रीच्या दुकानात घंटागाड्या उभ्या राहतात त्यामुळे वाहनधारकाला तारेवरची कसरत करावी लागते.
साईनाथनगर चौफुलीलगत आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्यामुळे तेथे येणारे विद्यार्थी व पालक आपली वाहने सर्रासपणे जॉगिंग ट्रॅक व रस्त्यावर लावत असल्याने अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले आहे. वडाळ गावातील शंभर फुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात अनधिकृत रिक्षा थांबा झाला आहे. याठिकाणी रस्त्यावरच दहा ते बारा रिक्षा प्रवाशांची वाट बघत उभे असतात. हा रस्ता वाहतुकीस अरुंद पडत असून लहान-मोठे अपघात घडत आहेत. साईनाथनगर चौफुलीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु अमृत वर्षा कॉलनी ते साईनाथनगर चौफुली रस्ता जमीन ताब्यात न मिळाल्याने व्यवस्थित रुंदीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे सिग्नलवर वाहतुकीची कोंडी होत आहे.

Web Title: Traffic congestion junction to Indiranagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.