काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

By admin | Published: August 14, 2014 10:07 PM2014-08-14T22:07:41+5:302014-08-15T00:32:21+5:30

काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

The traffic congestion at Katyamaruti Chowk | काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

Next

 

पंचवटी : जुना आडगाव नाका येथील श्री काट्यामारुती चौकात वाहतुकीची कायम कोंडी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली, तरी ती चुकीची असल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
जुना आडगाव नाका चौफुलीवरून दैनंदिन शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. शाळकरी विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना या चौफुलीवरून रस्ता ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. वाहतूक शाखेच्या वतीने या चौकात वाहतूक पोलीस नेमण्यात आलेला असला, तरी कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीत वाहतुकीची कोंडी होते. त्यातच सिग्नल यंत्रणा सुरू असली तरी त्याचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा केवळ नावालाच उरली असून, सिग्नल बसविलेले असले, तरी वाहनधारक सिग्नलचा वापर करीत नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविलेली असली, तरी ती चुकीच्या पद्धतीने बसविलेली असल्याने सिग्नल यंत्रणा ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या आडगाव नाका चौफुलीवरून निमाणी बसस्थानकाकडे, हिरावाडीकडे, तसेच गणेशवाडीकडे वाहनधारक वाहने नेतात; मात्र सिग्नल यंत्रणेचा उपयोग होत नसल्याने वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीत सापडून मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दैनंदिन बघायला मिळते. (वार्ताहर)

Web Title: The traffic congestion at Katyamaruti Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.