वाहतुकीची कोंडी; पोलिसांचा ‘यू-टर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:33 PM2017-10-09T23:33:57+5:302017-10-09T23:34:02+5:30
नाशिक : द्वारका वाहतूक कोंडीवर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा आणि महापालिके ने दोन दिवसांसाठी ‘यू-टर्न’चा उतारा शोधला होता. यानुसार सोमवारी (दि.९) ‘यू-टर्न’चा प्रयोगासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले. मात्र वाहतुकीची कोंडी, नागरिकांचा संताप आणि पोलिसांची उडालेली तारांबळ यामुळे हा प्रयोग अव्यवहार्य असल्याच्या मतावर शिक्कामोर्तब झाले आणि अवघ्या दोन तासांतच पोलिसांनाच ‘यू-टर्न’ घेऊन हा प्रयोग संपवावा लागला. या घटनेनंतर पोलिसांनी सारवासारव करताना हा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे अगोदरच माहीत होते. मात्र, केवळ ‘न्हाई’च्या आग्रहाखातर तो राबवावा लागल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

मुंबई, पुणे, शिर्डी, संगमनेरच्या दिशेने जाणाºया वाहनांनी द्वारका सर्कलवरून पुणे महामार्गावर न जाता थेट कन्नमवार पुलाच्या दिशेने सरळ जाऊन महामार्गाच्या दुभाजक पंक्चरमधून ‘यू-टर्न’ घेत पुन्हा द्वारके वर यावे, असे सूचना फलक द्वारका चौकात सकाळी लावण्यात आले. यावेळी सर्कलशेजारी पुणे महामार्गाकडे जाणाºया वळणावर आणि द्वारका पोलीस चौकीजवळ सर्कलला लागून पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते.
सारडा सर्कलकडून येणाºया वाहनांना द्वारकेवरून उजवीकडे प्रवेश बंद करण्यात आला होता. ही वाहतूक सरळ कन्नमवार पुलापर्यंत जाऊन ‘यू-टर्न’ घेऊन पुन्हा द्वारकेवर येत डावीकडे पुणे महामार्गाने पुढे जावे, असा मार्ग दाखविण्यात आला. तसेच नाशिकरोडकडून येणाºया वाहनांना उड्डाणपुलाखालून द्वारका सर्कल ओलांडण्यास मज्जाव करण्यात आला होता. सारडा सर्कलकडे जाण्यासाठी हनुमान मंदिरापासून डावीकडे वळण घेत महामार्गाने थेट वडाळा नाक्यापर्यंत जाऊन तेथून उजवीकडे वळण घेऊन सारडा सर्कल, शालिमारच्या दिशेने जावे असा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला.