ब्रिटिशकालीन धोकादायक पुलामुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:17 AM2019-03-25T00:17:39+5:302019-03-25T00:18:14+5:30

नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

Traffic disruption due to the British dangerous dangerous bridge | ब्रिटिशकालीन धोकादायक पुलामुळे वाहतूक विस्कळीत

ब्रिटिशकालीन धोकादायक पुलामुळे वाहतूक विस्कळीत

Next

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या भागात कधी एसटी बस येते तर कधी येत नाही, अशी अवस्था असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
मैलोंमैल पायपीट करावी लागते तर कधी जीव धोक्यात घालून खासगी प्रवासी वाहतुकीने प्रवास करावा लागत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा याबाबत निवेदन देऊनही या पुलाची कुठल्याही प्रकारची दुरु स्ती न झाल्याने नागरिक वैतागले आहेत.
ओझरखेड शिवारात कश्यपी व गोदेच्या संगमावर असलेला जुना अरुंद पूल अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण धोकादायक अवस्थेत गेला आहे. एसटी महामंडळाचे बसचालक या पुलावरून बस घेऊन जाण्यास कचरतात. या भागातील गावांकडे जाणारी बस वाहतूक व अन्य दळणवळणाची साधने या इंग्रजकालीन अरुं द पुलामुळे संपूर्ण विस्कळीत झाली आहे. या पुलाचे बांधकाम व्हावे या कामी सार्वजनिक बांधकाम विभागाने कित्येक वेळा सर्व्हे केला मात्र पूल आजही धोकादायक स्थितीत असून शालेय विध्यार्थी, शेतमाल वाहतूक, कामगार, मजूर, गावकरी यांना गंगाम्हाळुंगी, ओझरखेड, शिवणगाव, गणेशगाव, नासलगाव, पिंपळगाव गरु डेश्वर अशा अनेक गावांना जाणारा मार्गच धोकादायक झाला आहे. यामुळे या भागात चालणारी एसटी महामंडळाची बससेवा बंद पडली आहे. याचा विपरीत परिणाम या भागातील दळणवळणावर झाला असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
गंगाम्हाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत असून, आठ ते दहा हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. ओझरखेड ते गंगाम्हाळुंगी रस्ता आजच्या स्थितीत अत्यंत दुरवस्थेत आहे. एकीकडे ओझरखेड शिवारातील अरुं द जुना धोकादायक पूल याकडे सार्वजनिक बांधकाम व आमदार खासदारांनी सातत्याने दुर्लक्ष केले असल्याने या भागातील शेती, शिक्षण व मोलमजुरी करणाऱ्या व्यवस्था अत्यंत अडचणीत आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या मागील बाजूला असलेल्या ओझरखेड, गंगाम्हाळुंगी, राजेवाडी, शिवणगाव, गणेशगाव (ना.), गणेशगाव (त्रं.), पिंपळगाव गरुडेश्वर या भागातील शेतकरी, विद्यार्थी, मजूरवर्ग कामानिमित्त गिरणारे गावात ये-जा करतात. त्यांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या भागात एसटी महामंडळाचे अधिकारी बस सेवा सुरू करीत नाहीत़
गिरणारे गावाकडे येणारा मार्गच अरुं द पूल व धोकादायक रस्त्यामुळे अडचणीत आला असून, या भागात चालणारी वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. विद्यार्थी व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मैलोंमैल पायी चालत पंचक्र ोशीतील गावांना यावे लागते. यात वेळेसह मानसिक ताणही सहन करावा लागत आहे. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे़
अत्यंत धोकादायक ठरलेल्या या पुलामुळे या भागात बस येत नाही़ दुर्दैवाने एखादी घटना घडली तर एसटी महामंडळावर त्याचे खापर फोडले जाण्याच्या भीतीने बस बंद आहे़ हा पूल फार जुना असून अरुंद आहे. या पुलावरून एकावेळेस एकच वाहन जाते दुसºया वाहनाला जाण्यास जागाच नसते. तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे तुटलेले असल्याने आणि रस्त्यांवर खड्डे असल्याने सर्व प्रकारच्या वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित हा पूल दुरु स्त करण्याची गरज आहे.
- बाळासाहेब गभाले,
माजी सदस्य, जिल्हा परिषद
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्याला आजपर्यंत कुठलाही स्थानिक आमदार, खासदार मिळाला नाही. या भागाने नेहमी पूर्व पट्ट्यातील आमदार, खासदार निवडून दिले. यामुळे आमच्या गंगाम्हाळुंगी, ओझखेड भागातील वाहतूक दळणवळण व आमच्या नागरी समस्या कित्येक वर्ष सुटल्या नाही. बस बंद पडल्याने आम्हाला मैलोंमैल पायपीट करावी लागते. शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील पायपीट करावी लागते हे दुर्दैव आहे.
- रावजी फसाळे, नागरिक

Web Title: Traffic disruption due to the British dangerous dangerous bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.