उड्डाणपूल जोडणीसाठी वाहतूक वळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:00+5:302021-05-27T04:16:00+5:30
पुलाचे काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या मुदतीपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे काम ...
पुलाचे काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या मुदतीपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्याने जोडणीनंतर सलग पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आगामी ४५ दिवसांत नवीन उड्डाणपूल जोडणीचे काम केले जाणार आहे. जुन्या उड्डाणपुलावरून धुळ्याकडून येणारी वाहने द्वारका येथून खाली उतरविण्यात येणार आहेत, तर द्वारका येथून वाहने कन्नमवार पूल, ट्रॅक्टर हाउस, तपोवन चौफुली, संतोष टी पॉइंट, स्वामी नारायण चौकातून अमृतधाम चौफुलीमार्गे धुळ्याकडे जातील, तसेच रॅम्पवरून पुलावर जाण्यास मनाई केली आहे.
धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना समांतर रस्त्याने क. का. वाघ ते अपोलो हॉस्पिटलपर्यंत उजव्या हाताने वळण घेऊन पुढे स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉइंट, तपोवन क्रॉसिंग, ट्रॅक्टर हाउसपुढे द्वारका उड्डाणपूल प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक बदलासाठी १६ पॉइंट तयार करण्यात आले असून, त्यासाठी दोन अधिकारी डझनभर वाहतूक पोलीस आणि ६० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येणार आहेत.
===Photopath===
260521\26nsk_50_26052021_13.jpg
===Caption===
उड्डाणपुल जोडणीसाठी वाहतूक वळविली