द्वारकावर वाहतूक कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:23 AM2018-06-04T01:23:45+5:302018-06-04T01:23:45+5:30
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाºयांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल. अशी नागरिकांची अपेक्षा होती़ मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे चौकातील वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. विशेष म्हणजे पादचाºयांसाठी तयार करण्यात आलेला हा चौकातील भुयारी मार्गदेखील बंद आहे़ जुने नाशिक तसेच सारडा सर्कलकडून येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवित असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते़ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.
या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत परिसरातील रिक्षाचालक व बसच्या थांब्यामुळे आणखी भर पडते़ रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून, रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवासी बसविले जातात. तसेच द्वारका पोलीस चौकीजवळ असलेला बसथांबा व तिथेच उभे असलेले रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ काठेगल्ली चौक ते द्वारकापर्यंतचा रस्त्यावर फळविक्रेते ठिकठिकाणी उभे असतात़ त्यामुळे नाशिकरोडहून शालिमारकडे जाणारी वाहतुकीस अडथळा होतो़ द्वारका सर्कलवरील या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी
रोजच लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता आहे़
सकाळ, सायंकाळी वाहनांच्या रांगा
द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़
४शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.
४वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.