धुमाळ पाॅईंट चौकात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:40+5:302021-06-19T04:10:40+5:30
रेशन दुकानांची तपासणी सुरू नाशिक : जिल्ह्यात सध्या मोफत धान्य वितरण केले जात असल्याने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची तपासणी केली ...
रेशन दुकानांची तपासणी सुरू
नाशिक : जिल्ह्यात सध्या मोफत धान्य वितरण केले जात असल्याने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची तपासणी केली जात आहे. शहर आणि तालुक्याच्या ठिकाणीदेखील पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून रेशन दुकानांच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपासणी सुरू करण्यात आली आहे.
लसीकरण केंद्राजवळ वाहनांची गर्दी
नाशिक : उपनगर येथील प्राथमिक आरेाग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्यांची मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच गर्दी होत असते. केंद्राच्या बाजूलाच मोठी रहिवासी वसाहत तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठदेखील आहे. लसीकरण नसताना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळताे.
बेड रिक्त झाल्याने दिलासा
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने येथील बेड्स मेाठ्या प्रमाणात रिकामे झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असून, बाधितांना तत्काळ उपचार उपलब्ध होत आहे. गेल्या महिनाभरापासून मनपा रुग्णालयांतील रुग्ण कमी होत आहेत.
गोदावरी नदीत अनेक ठिकाणी पानवेली
नाशिक: गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पानवेली तरंगत असल्याचे दिसते. विशेषत: निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील पात्रावर पानवेली वाढत आहेत. नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात पानवेली वाढत असून, पाणी दूषित होत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, पानवेली काढण्यास सुरुवात झाली आहे.
लसीकरण केंद्रावर परतावे लागले
नाशिक: म्हसरुळ येथील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने सकाळी केंद्रावर पोहोचलेल्या अनेकांना परतावे लागले. लसीबाबतची अनािश्चितता असली तरी केंद्रांनादेखील याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने ऐनवेळी त्यांना लसीच्या उलब्धतेबाबत फलक लावावा लागतो. ऐनवेळी फलक लावण्यात आल्यामुळे वादाचे प्रसंगदेखील उद्भवतात.
बहुजन मुक्ती पार्टी कार्यकर्त्यांवर गुन्हे
नाशिक: पेट्रेाल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धक्का मारो आंदोलन करणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे गेल्या मंगळवारी धक्का मारो आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्ते पोहोचले होते. याप्रकरणी गर्दी जमविल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वेची ऑनलाइन पेन्शस अदालत
नाशिक: मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाच्यावतीने ऑनलाइन पेन्शन अदालतीचे आयेाजन करण्यात आले होते. या पेन्शन अदालतीमध्ये नाशिकसह विभागातून एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. यामध्ये काही प्रकरणांमध्ये तक्रारदारांना भरपाईदेखील देण्यात आली.