जिल्हाभरात चक्काजाममुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:06 AM2017-08-15T00:06:18+5:302017-08-15T00:17:59+5:30
नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
महिरावणीत जनावरे रस्त्यावर: पुणे-नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलन
नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाभरातील शेतकºयांनी ‘एकच नारा, सातबारा कोरा’, नरेंद्र मोदी, शेतकरी विरोधी अशा घोषणा देत सरकारचा निषेध करत शेतकºयांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. नाशिक जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वररोड, पळसे, चांदोरी, येवला, दिंडोरी, घोटी, सुरगाणा, पेठ, मनमाड, चांदवड, नांदगाव आदि ठिकाणी शेतकºयांनी रास्ता रोकोे करून आंदोलन केले. महिरावणी येथे सकाळी १२ वाजता सुमारे तीनशे ते चारशे शेतकºयांनी अचानक जमा होऊन रास्ता रोको केला. हळूहळू शेतकºयांची संख्या वाढत जाऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर हजारो शेतकरी उतरले. यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य कैलास खांडबहाले यांच्यासह डॉ. डी. एल. कराड, हंसराज वडघुले, दत्तू ढगे, गणपत खांडबहाले, पुरुषोत्तम कडलग, माधुरी भदाणे आदिंसह परिसरातील गावांतील तरुण, वृद्ध व महिला शेतकºयांनीही आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक रोड भागातील पळसे येथील शेतकºयांनी नाशिक-पुणे महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही महामार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्णातील वेगवेगळ्या राज्य महामार्गावरही वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी संतप्त शेतकºयांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करताना टॅÑक्टर, बैलगाड्या व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून आंदोलन केले. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्हीही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शेतकºयांना निकषांसह कर्जमाफीचे आश्वासन देऊन राज्य सरकारने शेतकºयांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकºयांच्या सुकाणू समितीने केला असून, सरकारच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी सुकाणू समितीने किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सोमवारी (दि. १४) राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले. यानंतरही सरकारने शेतकºयांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशाराही सुकाणू समितीने दिला आहे.
शेतकºयांच्या मागण्या
शेतकºयांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
शेतकºयांना वृद्धापकाळी तीन हजार रुपये पेन्शन मिळावी.
ठिबक सिंचनला शंभर टक्के अनुदान मिळावे.
शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे.
शेतीला कायमस्वरूपी मोफत वीज द्यावी.
शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव मिळावा.
गायीच्या दूधाला ५० तर म्हशीच्या दूधाला ६५ रुपये हमीभाव मिळावा.
पीकविम्याची रक्कम शासनाने भरावी.
समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ, बागायती जमीन घेऊ नये.