ट्रक पलटल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Published: March 25, 2017 11:20 PM2017-03-25T23:20:27+5:302017-03-25T23:20:44+5:30
पांडाणे : गुजरात राज्याला जोडणाऱ्या वणी - सापुतारा रस्त्यावर उसाचा ट्रक पलटी झाल्याने नाशिक व शिर्डीकडे जाणारा रस्ता बंद झाला होता.
पांडाणे : गुजरात राज्याला जोडणाऱ्या वणी - सापुतारा रस्त्यावर उसाचा ट्रक पलटी झाल्याने नाशिक व शिर्डीकडे जाणारा रस्ता बंद झाला होता.गुजरातकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक (क्र . एमएच १५ सीके १७६२) अंबानेर शिवारात पहाटे ३ वाजेच्या सुमारास पलटी झाला. यावेळी झालेल्या जोरदार आवाजामुळे अंबानेर, पांडाणे, सागपाडा परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याकडे धाव घेतली व ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु उसासहीत ट्रक पलटी झाल्यामुळे सकाळी ७ वाजेपर्यंत ट्रकमधून ऊस बाहेर काढून रिकामा केला. त्यामुळे छोट्या वाहनांना मार्ग सुरळीत झाला. वणी - सापुतारामार्गे नाशिक व शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पहाटे ३ वाजेपासून तेथेच ताटकळण्याची वेळ आली. ट्रक बाजूला करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळी ७ वाजले होते. तोपर्यंत वणी - सापुतारा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सूरत, अहमदाबाद, बडोदा तसेच नाशिक, शिर्डी आदिकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. सकाळी ७ वाजेच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या मुलांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. (वार्ताहर)