सिन्नर -ठाणगाव रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:40 PM2019-08-10T23:40:48+5:302019-08-10T23:43:17+5:30
ठाणगाव : सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक सहा तासांहून अधिक काळ खंडित झाली, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.
ठाणगाव : सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक सहा तासांहून अधिक काळ खंडित झाली, त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.
सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाºया ठाणगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतमाल संपूर्ण सडून जात आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास डुबेरेवाडीजवळील अण्णाच्या मळ्यात एक बाभळीचे मोठे झाड वाºयामुळे उन्मळून पडले.
झाड खूप मोठे असल्याने व आजूबाजूला वस्ती नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावरून प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.
या रस्त्यावरून महामंडळास खूप बसेस धावतात व सर्वाधिक उत्पन्न मिळवितात. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर पडलेले झाड उन्मळून पडले.
या पडलेल्या झाडामुळे ठाणगाव - सिन्नर हा रस्ता वाहतुकीसाठी सहा तास बंद झाल्याने प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.परिवहन महामंडळाच्या वतीने मात्र ज्या ठिकाणी झाड पडलेले आहे त्या जागेपर्यंत सिन्नरवरून प्रवासी भरले जात होते व झाडाच्या पलीकडे असणाºया दुसºया बसमध्ये प्रवाशांना सुरळीत पाठविले जात असल्याचे चित्र दिसले. झाड रस्त्यावर आल्याने दोन्हीकडील चालक-वाहक प्रवाशांना सुखरूप पोहोचवत असल्याचे पाहण्यास मिळाले.