द्वारका चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:11+5:302021-02-20T04:38:11+5:30

मोकळी मैदाने बनला मद्यपींचा अड्डा नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या अनेक मैदानांचा ताबा मद्यपींनी घेतला असून, सायंकाळपासूनच ...

Traffic jam at Dwarka Chowk | द्वारका चौकात वाहतूक कोंडी

द्वारका चौकात वाहतूक कोंडी

Next

मोकळी मैदाने बनला मद्यपींचा अड्डा

नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या अनेक मैदानांचा ताबा मद्यपींनी घेतला असून, सायंकाळपासूनच येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत येथे अनेक मद्यपींचा येथे धिंगाणा सुरू असतो. तसेच काही पडक्या, जुन्या इमारतींच्या काही भागांत अंधार असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत मद्यपी त्या इमारतींमध्ये त्यांचा अड्डा बनवित असल्याने त्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

महाबळ चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार

नाशिक : रविवार कारंजा परिसरातून येणारे दुचाकीस्वार गंजमाळ येथील सिग्नलवर न थांबता नियमांचे उल्लंघन करीत टिळक पथवरून पुढे जात असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, त्यावर सातत्याने वर्दळ सुरू असते. अशावेळी अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक सिग्नलकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताची शक्यता वाढते. या चौकात कधीही वाहतूक पोलीस दिसत नसल्यामुळे तर बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावत आहे.

पंचवटीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

नाशिक : शहरातील पंचवटी भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी हिरावाडी, मखमलाबाद, आडगाव नाका, दिंडोरीरोड, पेठरोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर बोगद्याजवळ पूर्णवेळ पोलिसाची मागणी

नाशिक : शहरातून इंदिरानगरकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ अनेकदा दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होते. अनेकवेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात. कोंडीमुळे अनेकवेळा वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रकार घडतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने होत असते.

गडकरी चौक ते सारडा सर्कलवर दुतर्फा वाहने

नाशिक : गडकरी चौक ते सारडा सर्कलदरम्यान असलेल्या रस्त्यावर नवीन वाहनांना सजवण्याचे तसेच अन्य दुरुस्तीची कामे होत असल्याने या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. या भागातील वाहतूककोंडीमुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

पंचवटीत रस्त्यावर अतिक्रमण

नाशिक : पंचवटीत रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि पोलिसांनी या भागातील किरकोळ विक्रेत्यांना हटविले होते. परंतु, लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा या भागात किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण

नाशिक : महानगरात विविध ठिकाणी पुन्हा अनधिकृत जाहिरातींचे फलक लावण्याचे पेव फुटले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांचे विद्रुपीकरण केले जात आहे. पंचवटी, मध्य नाशिक भागात अशाप्रकारे पोस्टर भित्तिपत्रके लावून विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. स्वस्त पडत असल्याने या फलकबाजीद्वारे स्वत:चे नाव नागरिकांच्या मनात ठसवण्यासाठी सर्व प्रकार सुरू आहेत.

उड्डाणपुलाखाली खासगी वाहने

नाशिक : उड्डाणपुलाखाली अनेक खासगी आणि अन्य मालट्रक उभ्या केल्या जात असल्याने प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. व्दारका परिसरातील दोन्ही सर्व्हिस रोडवर गॅरेजची संख्या मोठी असल्याने तसेच अन्य व्यावसाियक गाळे असल्याने त्यांची वाहने ही द्वारका उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत उभी केली जातात.

Web Title: Traffic jam at Dwarka Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.