कसारा घाटातील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:16 PM2019-07-31T14:16:50+5:302019-07-31T14:16:58+5:30
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुंबई आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्याने रस्ता खचत चालला होता. रस्ता दुरु स्त करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासुन जुना कसारा घाटातील मुंबईहुन नाशिकला येणारी वाहतुक नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या नवीन घाटातून वळविण्यात आल्याने घाटात नेहमीच ट्रेफीक जाम होऊन वाहतुक संथ गतीने सुरु असते. मागेच दोन महिन्यापुर्वीच कसारा घाटातील रोडचे दुरु स्तीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी एकेरी वाहतूक चालु होती त्यामुळे कित्येक वाहनांचे अपघात झाले आहे असुन त्यात जीव गमवावा लागला होता. या रोडचे काम पूर्ण होऊन महिनाही उलटला नसुन पहिल्या पावसातच संपूर्ण रोड खड्डेमय झाला आहे. ठेकेदाराने कसारा घाटातील रोडचे डागडुजी करण्यातसाठी कामाला सुरु वात केली आहे. परंतु पुन्हा मागच्या सारखेच स्वतची मनमानी करु न जुना कसारा घाट पुर्णत बंद करु न नवीन घाटातुन एकेरी वाहतूक चालु केली आहे. यामुळे घाटात वाहतुक कोंडी होत आहे. दोन तासांपासुन ठप्प असलेल्या नवीन कसारा घाटात अखेर महामार्ग सुरक्षा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहतुक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.