कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे नांदगावला वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:31 AM2019-10-05T01:31:41+5:302019-10-05T01:32:52+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
नांदगाव : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
स्थानिक हॉटेल्स व किरकोळ विक्रे ेत्यांची मोठी विक्र ी झाली. मालेगाव-मनमाड रस्त्यावर गुप्ता लॉन्समध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे, माउली मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ व जैन धर्मशाळेत भाजपचे नाराज इच्छुक रत्नाकर पवार या सर्वांनी शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. शिवसेनेची जुन्या तहसीलसमोर जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीची सभा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. नांदगाव शहरात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेससह अपक्ष उमेदवारांनी काढलेल्या रॅलीमुळे रहदारी ठप्प झाली होती. या दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी अनेकांच्या चारचाकी, दुचाकी वाहनांची हवा काढण्याचा सज्जड दम भरल्यानंतर रस्त्यावर उभी असलेली वाहने हलविण्यात आली. रहदारी सुरळीत करणेकामी पोलिसांची दमछाक झाली होती. सुमारे तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.