जिल्हा परिषद मार्गावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:12+5:302021-02-11T04:16:12+5:30
नाशिक : शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदल्यामुळे या परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ ...
नाशिक : शहरातील विविध भागात वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदल्यामुळे या परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यात्रोत्सव रद्द झाल्याने नाराजी
नाशिक : नाशिकरोड येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारा बाल येशु यात्रोत्सव यावर्षी कोरोनामुळे रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी मात्र यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
नेहरू नगरमधील सदनिकांची दुरवस्था
नाशिक : प्रेस कामगारांची वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेहरू नगर वसाहतीमधील अनेक सदनिका रिकाम्या असून, या सदनिकांची दुरवस्था झाली आहे. परिसरात नागरिकांचा वावर कमी झाल्याने संपूर्ण वसाहतीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक सदनिकांच्या दार खिडक्यांची मोडतोड झाली आहे.
कॅनॉल रोडवर अंधाराचे साम्राज्य
नाशिक : कॅनॉल रोडवरील अनेक पथदीप बंद असल्यामुळे या मार्गावर रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी अंधाराजे साम्राज्य पसरते. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते, तसेच झोपडपट्टीतील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. अंधारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. येथील पथदीप सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
फिजिकल डिस्टसिंगकडे दुर्लक्ष
नाशिक : येथील बाजार समितीमध्ये सायंकाळच्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचा फज्जा उन्हाळा असून, अनेकांचे मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. माल विक्रीसाठी समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पंडित कॉलनीत पायी चालणेही मुस्कील
नाशिक :पंडित कॉलनीत रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील व्यावसायिकांना याबाबत समज देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीबाबत नाराजी
नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. थकबाकी भरण्यास काही सवलत देण्यात यावी व वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.