रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे रहदारीला होतो अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:31 AM2018-06-05T00:31:40+5:302018-06-05T00:31:40+5:30
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.
सातपूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सातपूर परिसरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विक्रे त्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात सातपूर विभागाने यापूर्वीच आघाडी घेतली आहे. विक्रेत्यांसाठी निर्देशित केलेल्या जागेवर गुंजाळ पार्कजवळ रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेत्यांना तपारिया कंपनीनजीकच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या निर्देशानुसार जागेची आखणी पूर्ण करण्यात आली आहे आणि विक्र ेत्यांना जागाही प्रदान करण्यात आली आहे. मात्र संबंधित विक्रेते पूर्वीच्या जागेवरच व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याचवेळा विक्रेते आणि वाहनधारकांमध्ये हमरीतुमरीदेखील होत असते. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून त्र्यंबक रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना तपारिया कंपनीजवळील जागेत स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.पुन्हा ‘जैसे थे’ महापालिकेच्या वतीने जवळपास दररोज त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांना हटविण्याचे आणि त्यांचा भाजीपाला जप्त करण्याची कारवाई केली जाते. या कारवाईत विक्र ेत्यांचे नुकसान होत असले तरीही हे विक्र ेते जागा सोडण्यास तयार नाहीत. महापालिकेची गाडी आली की हे विक्र ेते पळ काढतात. गाडी गेली की पुन्हा मूळ जागेवर येऊन बसतात.