शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 05:30 PM2019-05-05T17:30:19+5:302019-05-05T17:30:36+5:30

कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

Traffic police in the city unsafe; Increased floor to rattle | शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल

शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल

Next
ठळक मुद्देलागोपाठ दुसरी घटना घडल्याने संताप

नाशिक : कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत सलग दुसरी घटना लागोपाठ घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहर वाहतूक शाखेस नेमणूक असलेले पोलीस शिपाई मयुर राजकिशोर सिंग (२९) हे जुना गंगापूर नाका येथे शनिवारी (दि.४) आपल्या कर्तव्यावर असताना संशयित दुचाकीस्वार फिलीप चंद्रकांत धोड याने त्याच्या ताब्यातील मोपेड दुचाकी सिंग यांच्या अंगावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिलीप याने त्यांच्या शासकिय गणवेशावर हात टाकला. याप्रकरणी सिंग यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी त्याच्याविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
दोन दिवसांपुर्वी मॅरेथॉन चौक गंगापूररोड येथे उपनिरिक्षक जाधव हे वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-या वाहनचालकांविरूध्द कारवाई करत होते. यावेळी संशयित रिक्षाचालक सुमीत हरिश गांगुर्डे (२८,रा. घारपुरे घाट, अशोकस्तंभ) याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (एम.एच.१५ एफयू२०५३)मध्ये स्वत:शेजारी प्रवाशांना बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना आढळून आला. यावेळी जाधव व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास थांबविले व मुळ कागदपत्रांसह वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्याबाबत सांगितले. यावेळी कॉन्स्टेबल काकड यांच्याशी त्याने वाद घालत मारहाण करण्याची धमकी देऊन अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला अन्य सहकारी पोलिसांनी रोखले. सरकारी काम करण्यापासून परावृत्त करत अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी संशयित सुमीत यास अटक केली आहे.

मानसिक खच्चीकरण
शहर वाहतूक पोलीस भरदिवसा रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावण्यास प्राधान्य देतात तसेच नियमबाह्य वाहतूक करणाºया वाहनचालकांविरूध्द दंडात्मक कारवाई करत शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात; मात्र मागील काही दिवसांपासून शहरात वाहतूक पोलिसांसोबत हमरीतुमरी करत वाद घालत धक्काबुक्की करण्यापर्यंत वाहनचालकांची मजल गेल्याने पोलिस कर्मचा-यांने मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यांचे मनोबल ढासळत असून अशा घटना वेळीच रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

Web Title: Traffic police in the city unsafe; Increased floor to rattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.