वाहतूक पोलिसांचा ‘डबल’ धमाका...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:44 AM2017-10-24T00:44:18+5:302017-10-24T00:44:24+5:30
चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यानंतर ती उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडे जाणाºया वाहनचालकाला डबल भुर्दंड सहन करावा लागत आहे. जुन्या पोलीस आयुक्तालयात सदरची दुचाकी आणण्यासाठी जाणाºया वाहतूक पोलिसांना आयतेच सापडतात मग ज्या पर्यायी दुचाकीवरून संबंधित जातात, त्या दुचाकीची कागदपत्रे हेल्मेट अशी सर्वच बाबींची विचारणा होते आणि लगोलग दंडासहीत वसूलीही होत असते.
नाशिक : चुकीच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यानंतर ती उचलेगिरी करणाºया ठेकेदाराकडे जाणाºया वाहनचालकाला डबल भुर्दंड सहन करावा लागत आहे. जुन्या पोलीस आयुक्तालयात सदरची दुचाकी आणण्यासाठी जाणाºया वाहतूक पोलिसांना आयतेच सापडतात मग ज्या पर्यायी दुचाकीवरून संबंधित जातात, त्या दुचाकीची कागदपत्रे हेल्मेट अशी सर्वच बाबींची विचारणा होते आणि लगोलग दंडासहीत वसूलीही होत असते. शहरात पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसतानादेखील त्याची सोय करणे सोडून वाहतूक पोलिसांनी वाहन उचलेगिरी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे कोठेही दुचाकी उभी केली की, सावज हेरण्याच्या तयारीत असलेल्या वाहन उचलेगिरी करणाºया ठेकेदाराचे कर्मचारी तत्काळ वाहने उचलतात. एकदा दुचाकीला हात लावला की दुचाकीचालक धावपळ करीत आला तरी त्याला जुन्या पोलीस आयुक्तालयात या असे सांगून ठेकेदाराची ट्रक सुसाट रवाना होते. आपली दुचाकी ही नो पार्किंगच्या ठिकाणी नव्हती किंवा अन्य काही सबब ऐकण्याची कोणाला वेळ नसतेच. त्यामुळे त्रस्त दुचाकीस्वार दुसºया एखाद्याची मोटारसायकल घेतो किंवा एखाद्या मित्राच्या दुचाकीवर स्वार होऊन तो जुन्या पोलीस आयुक्तालयात ठेकेदाराकडे दंड भरण्यासाठी धावपळ करीत पोहोचत नाही तोच समोर पाच-दहा पोलीस हजरच असतात. ज्या दुचाकीवरून तो चालक येतो, त्यालाच पकडून झाडाझडती केली जाते. त्याच्याकडील दुचाकीची कागदपत्रे, हेल्मेट आणि अन्य बाबींची पडताळणी केली जाते आणि कोणती तरी उणीव शोधून तत्काळ दंड ठोठावला जातो. वाहतूक पोलिसांच्या या डबलबारमुळे दुचाकीचालक मात्र घायकुतीला येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून पोलिसांच्या दंडात्मक उत्पन्नासाठी सर्वसामान्यांना टार्गेट केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.