वाहतूक पोलिसांनी युवकांना मारहाण नव्हे तर कायदेशीर गुन्हा दाखल केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 04:04 PM2019-04-14T16:04:48+5:302019-04-14T16:08:24+5:30

वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते; मात्र याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून निरर्थक आहे. वाहतूक पोलीस कोणालाही मारहाण करत नाही, केवळ दंडात्मक कारवाई करताात.

Traffic Police filed a legal complaint but not a youth | वाहतूक पोलिसांनी युवकांना मारहाण नव्हे तर कायदेशीर गुन्हा दाखल केला

वाहतूक पोलिसांनी युवकांना मारहाण नव्हे तर कायदेशीर गुन्हा दाखल केला

Next
ठळक मुद्देसंबंधित युवकांवर केवळ कायदेशीर कारवाई मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची दोषी आढळणाऱ्यांविरूध्द कायदेशीरपणे कठोर कारवाई

सिडको : वाडीव-हे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डीफाट्यावर विना हेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले; मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. कमी पैसे घेऊन गाडी सोडण्यास सांगितले असता एकाने मोबाइलमधून चित्रीकरण करण्यास सुरूवात केल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसांनी युवकाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे; मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी कुठलीही घटना घडली नसून संबंधित युवकांवर केवळ कायदेशीर कारवाई अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी फाटा येथून दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाºया दोघा मित्रांना अडवून त्यापैकी एका युवकाला वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची चर्चा शहरभर पसरली. हेल्मेट घातले नसल्याच्या कारणावरून पोलीस व युवक यांच्यात झालेल्या वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते; मात्र याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून निरर्थक आहे. वाहतूक पोलीस कोणालाही मारहाण करत नाही, केवळ दंडात्मक कारवाई करताात. त्या युवकांनी दंड भरण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी रितसर अंबड पोलीस ठाण्यात वाहतूक नियमांचा उल्लंघन करत विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या युवकांनी पोलीसांचे मोबाईलने चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्याचा राग मनात धरून त्यांनी वाहतूक पोलिसांविषयी चुकीची माहिती देत विनाकारण समाजात प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती घेतली जात असून दोषी आढळणाऱ्यांविरूध्द कायदेशीरपणे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे नखाते यांनी सांगितले.

Web Title: Traffic Police filed a legal complaint but not a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.