केवळ दोनच चौकांत वाहतूक सुरक्षिततेचे धडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:02 AM2018-06-05T01:02:33+5:302018-06-05T01:02:33+5:30

शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स्मार्ट वाहतुकीसाठी सुशोभिकरण करण्यात आले असून, या सिग्नलवरील पिवळ्या तसेच हिरव्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय? वाहनधारकांनी केव्हा व कोठे थांबायचे? याबाबत वाहनचालक अनभिज्ञ असल्याचेच समोर आले आहे़ दरम्यान, शहरातील इतर प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणाचे घोडे कोठे अडले, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

 Traffic safety lessons in only two blocks ... | केवळ दोनच चौकांत वाहतूक सुरक्षिततेचे धडे...

केवळ दोनच चौकांत वाहतूक सुरक्षिततेचे धडे...

googlenewsNext

नाशिक : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स्मार्ट वाहतुकीसाठी सुशोभिकरण करण्यात आले असून, या सिग्नलवरील पिवळ्या तसेच हिरव्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय? वाहनधारकांनी केव्हा व कोठे थांबायचे? याबाबत वाहनचालक अनभिज्ञ असल्याचेच समोर आले आहे़ दरम्यान, शहरातील इतर प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणाचे घोडे कोठे अडले, असा प्रश्न निर्माण झाला आहे़  स्मार्ट सिटीतील शहरातील वाहतूकही स्मार्ट व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे स्मार्ट नियोजन केले होते़ त्यानुसार प्रारंभी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना शहरातील सुमारे सतरा प्रमुख चौक दत्तक घेण्यास सांगण्यात आले होते़ दत्तक घेतलेल्या चौकांचे प्रायोजकांच्या माध्यमातून सुशोभिकरण तसेच सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, वळण, ना थांबा क्षेत्र अशी विविध चिन्हे काढण्यात येणार होती़ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना सुलभ होईल तसेच वाहतूक नियमांचे पालनही केले जाईल, असा यामागील हेतू होता़  पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार सर्वप्रथम शहरातील शरणपूर पोलीस चौकीजवळील सिग्नल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, वळण, ना थांबा क्षेत्र अशी विविध चिन्हे काढण्यात आली़ मात्र, या चिन्हांचा अर्थ वाहनधारकांना ना पोलीस यंत्रणेने समजावून सांगितला ना वाहनधारकांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे सिग्नलवरील हे उभे-आडवे रंगांचे पट्टे नेमके कशाचे हे वाहनधारकांना माहितीच नसल्याने वाहतूक नियमांचे पालन करणे तर दूरचीच गोष्ट़  पोलीस आयुक्तांनी निवडलेल्या सतरा प्रमुख चौकांपैकी केवळ दोनच चौक यानुसार करण्यात आले आहेत़ त्यामुळे उर्वरित पंधरा चौकांचे काम कधी पूर्ण होणार? होणार की नाही याबाबत साशंकताच आहे़
रंगांच्या चौकटीचा अर्थ काय
सिग्नलच्या चौकात पिवळ्या रंगाने ज्या चौकटी आखण्यात आल्या आहेत त्यावर कोणालाही वाहन थांबविता येणार नाही़
सिग्नल यंत्रणेतील हिरवा दिवा बंद होऊन पिवळा असेल तोपर्यंतच या पिवळ्या चौकटींवरून वाहने नेता येणाऱ
 सिग्नल लाल झाल्यास वाहनचालकांना या पट्ट्यावर थांबता येणार नाही.  सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच वाहने थांबवावी़
 सिग्नलवरील फ्री लेफ्ट भागात पिवळ्या रंगाचे पट्टे मारले असून त्या जागी कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करता येणार नाही़

Web Title:  Traffic safety lessons in only two blocks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.