रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:38 PM2019-08-06T17:38:50+5:302019-08-06T17:39:07+5:30
सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े
सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े मंगळवारी सकाळी दहा वाजता पुराचे पाणी कमी झाले असले तरी सखोल भागात आणि नदी लगतच्या भागात मात्र पाणी कायम आहे, सायखेडा चांदोरी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे, झाडे कापण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरु होते.
सहा दिवस नाशिक जिल्ह्यात सुरु असलेला पाऊस आणि सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होऊन गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी,चाटोरी, शिंगवे, चापडगाव, दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, मांजरगाव या गावांना महापूर येऊन सलग तीन दिवस गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. तर शेकडो लोकांचे स्थलांतर केले होते शिवाय हजरो लोक गावातील घरात, मजल्यावर अडकले होते , जनजीवन विस्कळीत होऊन सगळीकडे पूर परिस्थितीमुळे हाल झाले होते, चांदोरी येथे महामार्ग बंद झाला होता तर सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी पडत असल्याने सलग तिसर्या दिवशी वाहतूक बंद करण्यात आली होती, दुपार नंतर पुलावरचे पाणी कमी झाले असले तरी रस्त्यावरील झाडे पडल्याने वाहतूक बंद होती, रस्त्यावर ,घरात, अनेक शॉपिंग सेंटर, मॉल, दुकाने, बसस्थानक, या ठिकाणी तीन ते चार फूट गाळ साचल्याने कुठेही प्रवास करणे शक्य नव्हते