कवडीमोल भावामुळे कोबीवर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:12 PM2018-09-06T14:12:02+5:302018-09-06T14:12:16+5:30
वटार : सततच्या दुष्काळ आणि कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. तिच परिस्थिती पावसाळ्यात देखील तशीच सुरु असून टोमँटो, मिरची, कोबी, कोथिंबीर यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रु पये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात उत्पदान खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे. वटार येथे भाव नसल्याने एका शेतकºयाने संपूर्ण कोबीवर ट्रॅक्टर फिरविला. टोमँटो, मिरची, कोबी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांची गेल्या चार ते पाच महिन्यापासून दरात मोठी घसरण झाली असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. चक्क भाजीपाला बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ उत्पादक शेतकºयांवर आली असून काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्र ीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता १ ते ३ रूपये किलो इतका घसरल्याने उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
येथील जिभाऊ खैरनार या शेतकºयाने तीस हजार रु पये खर्च करून उभ्या केलेल्या कोबीच्या पिकावर रोटर मारले आहे. दररोजच्या हवामान बदल त्यात महागडी औषधांची फवारणी करून वैताकलेला शेतकरी वातावरण बदलामुळे कोबी पिकावर करपा,आळी,पाकोळी,आदी रोगांचा प्रादुर्भाव रोकू शकला नाही. उन्हाळाभर आपल्याकडे असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिकवलेल्या कांदा दोन पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवला होता. मात्र ठेवलेला कांदा देखील पन्नास टक्के सडला असून दिवसेंदिवस कांद्याचे दर देखील कोसळत असल्याने उत्पादक शेतकºयांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.