वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:03 AM2018-06-30T01:03:25+5:302018-06-30T01:03:40+5:30

सीतागुंफारोडवरील शिवाजीचौक परिसरात शुक्रवारी  (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याची घटना घडली़ टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्यानंतर परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

 Trail of vehicles by terrorists scare | वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत

वाहनांच्या काचा फोडून टवाळखोरांची दहशत

Next

पंचवटी : सीतागुंफारोडवरील शिवाजीचौक परिसरात शुक्रवारी  (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविल्याची घटना घडली़ टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्यानंतर परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.  शिवाजी चौक परिसरातील रस्त्यालगत काही नागरिकांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपल्या चारचाकी उभ्या केलेल्या होत्या़ पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या चार चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या़ त्यामध्ये मारुती-८०० (एम एच १५ एएस १९३०), मारुती ओम्नी (एमएच १५ एएस ६३३८), मारुती अल्टो कार (एमएच १५ डीएम ७४५४) व अन्य एक अशा चार वाहनांचा समावेश आहे. त्यानंतर या परिसरातील मुठाळ यांच्या घरावरही दगडफेक केली़  शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात काही मद्यपी तसेच टवाळखोरांचा वावर असून, शिवाजी चौकात दहशत माजविण्याचा उद्देशानेच टवाळखोरांनी उभ्या वाहनांच्या काचा फोडून दगडफेक केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे़ सकाळी वाहनांच्या काचा फोडल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ या घटनेनंतर वाहनांच्या मालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
अंतर्गत वादातून घडली घटना
काही महिन्यांपूर्वी पाथरवट लेन परिसरातील दोन गटांत जबर हाणामारी होऊन त्यांनी परिसरातील घरांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केल्याची घटना घडली होती़ या संशयितांनी अंतर्गत वाद व वर्चस्वाच्या कारणावरून या परिसरात दहशत माजविल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. दरम्यान, या परिसरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकात पुन्हा या प्रकारची घटना घडल्याने संशयित हे स्थानिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़

Web Title:  Trail of vehicles by terrorists scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.