रेल्वेस्थानकावर प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:15 AM2019-03-25T00:15:00+5:302019-03-25T00:15:20+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 In the train station, the driver beat | रेल्वेस्थानकावर प्रवाशाला मारहाण

रेल्वेस्थानकावर प्रवाशाला मारहाण

Next

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. उत्तर प्रदेशमधील सेरगुंवा मेहदपूर येथील व सध्या समृद्धी हायवे साइटरोडवर वावी, सिन्नर येथे राहणारा युवक राजकुमार सिंग अभिराज सिंग (२७) हा रेल्वेने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरला. रेल्वेस्थानकातून सिन्नर-वावी येथे जाण्यासाठी आंबेडकर रोडवरून  शिवाजी पुतळ्याकडे रस्त्याने पायी  जात असताना रिक्षाचालक व पाठीमागे बसलेल्या दोघा युवकांनी  राजकुमार सिंग याला अडवले. तसेच रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी दमदाटी करत राजकुमार सिंग  याला रिक्षात बसवून भाजीपाला मार्केट येथे अंधारात नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खांद्यावर  चाकूने वार करून जखमी केले.
तिघा संशयितांनी राजकुमार सिंगयाच्या खिशातील १३ हजार रुपयांचा मोबाइल व पाच हजार ७००
रुपयांची रोकड काढून घेऊन तेथून पोबारा केला. 
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
लुटमारीच्या घटनेत राजकुमार सिंग याने एमएच १५ व शेवटचे दोन क्रमांक ६१ अशी रिक्षा असल्याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित रिक्षाचालक सागर संतोष सूर्यवंशी (२८) रा. चंपानगरी जेलरोड, आशुतोष अनिल शेलार (२४) रा. अरिंगळे मळा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रिक्षा जप्त केली आहे. दोघा संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे.

Web Title:  In the train station, the driver beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.