रेल्वेस्थानकात वाहनांना पायबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:58 AM2017-08-07T00:58:06+5:302017-08-07T00:58:20+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानक आरक्षण तिकीट कार्यालयासमोर व रेल्वे पोलीस ठाण्यामागे जमिनीत पक्के बॅरिकेड्स लावण्यात आल्याने अनधिकृतपणे वाहने लावून जाणे बंद झाले आहे.

In the train station, the vehicles are rounded | रेल्वेस्थानकात वाहनांना पायबंद

रेल्वेस्थानकात वाहनांना पायबंद

Next

नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यामागे लावण्यात आलेले पक्के लोखंडी बॅरिकेड्स.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक आरक्षण तिकीट कार्यालयासमोर व रेल्वे पोलीस ठाण्यामागे जमिनीत पक्के बॅरिकेड्स लावण्यात आल्याने अनधिकृतपणे वाहने लावून जाणे बंद झाले आहे.
नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यामागे नवीन पादचारी पुलाच्या खाली व प्लॅटफॉर्मवर अनेक दुचाकीचालक आपली दुचाकी पार्किंग करत होते. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस ठाण्यामागे पादचारी पुलाला लागून जमिनीत पक्के बॅरिकेड््स लावले आहे. तसेच रेल्वेस्थानकांत प्रवेश केल्यानंतर आरक्षण तिकीट कार्यालयासमोरदेखील जमिनीत पक्के बॅरिकेड्््स लावण्यात आले आहे. यामुळे बेशिस्तपणे वाहने उभी करणाºयांना आता आपली वाहने पार्किंगमध्येच लावणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षितेला व वेडीवाकडी वाहने उभी करण्यामुळे वाहतुकीला होणारी अडचण दूर होण्यास मदत झाली आहे.

Web Title: In the train station, the vehicles are rounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.