रेल्वेमालगाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:44 PM2020-04-12T17:44:13+5:302020-04-12T17:44:46+5:30
जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.
मनमाड : जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.
या आव्हानात्मक वातावरणादरम्यान मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी तसेच सिग्नल व दूरसंचारची मालमत्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवाशी वाहतूक बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंची ने -आण करण्यासाठी मालगाड्या सुरळीत धावत आहेत. यासाठी सिग्नलिंग कर्मचारी व अधिकारी सिग्नल पोस्टची देखभाल करणे, रिले रूम देखभाल, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या सुरक्षित चालविण्यासाठी ट्रॅक मशीन चांगल्या स्थितीत ठेवण्याचे काम करीत आहेत. दूरसंचार अभियंता आणि त्यांच्या संबंधित प्रभागातील अन्य विभागीय अधिकारी नियमितपणे कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रेरणा देत आहेत. प्रत्येक तंत्रज्ञांना मास्क, सेनिटायझर्स, साबण आणि हातमोजे यांचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला जात आहे.