रेल्वेस्थानकातील कुलींच्या मदतीसाठी सरसावले कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:56 PM2020-04-03T22:56:22+5:302020-04-03T22:57:14+5:30

रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Trained staff to help the trainers in the train station | रेल्वेस्थानकातील कुलींच्या मदतीसाठी सरसावले कर्मचारी

मनमाड येथील गुरुद्वारा अन्नछत्र समितीकडून अन्नदान करताना स्वयंसेवक.

Next
ठळक मुद्देमनमाड : किराणा साहित्य वाटप; वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
रेल्वेस्थानक व येथून धावणाºया गाड्या आणि यातून प्रवास करणाºया प्रवाशांवर अवलंबून असलेल्या कुली या कष्टकरी लोकांची उपजीविका लॉकडाउनमुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वंचित घटकावर सध्या उपासमारीची वेळ आली
आहे. आपल्या स्थानकात काम करणाºया या कष्टकरी लोकांना संकट काळात मदत करण्यासाठी वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. स्थानकावरील ४० कुली लोकांना आटा, तांदूळ, चहा, साखर, तिखट, मीठ, हळद, डाळी, खाद्यतेल, फळे, बिस्कीट याबरोबरच हॅण्डवॉश पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाºयांच्या या उपक्रमामुळे परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गुरुद्वारा अन्नछत्र समितीचा उपक्रम
मनमाड : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे निराधार बेवारस लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील गुरुद्वारा गुपतसर साहेब यांच्या वतीने या निराधार लोकांसाठी शहरातील विविध भागांमध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्वत्र बंदची परिस्थिती सुरू राहील तोपर्यंत या बेघर लोकांना गुरुद्वाराच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येणार असल्याचे गुरुद्वारा अन्नछत्र समितीकडून सांगण्यात आले. देशामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातल्या रेल्वेस्थानकात निराधार, बेघर आणि मजूर या सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. परमजित ठकराल, संदीप पाटील, मनजित सिंग, गौरव पंजाबी, आतिक कुरेशी, बबलू खान, आतिक शेख, अतुल आहेर, पापा जगताप आदी स्वयंसेवक या कामासाठी परिश्रम घेत आहे.

लोहमार्ग पोलिसांकडून मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू असून सर्वत्र संचारबंदी आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात विविध ठिकाणी गोरगरीब, कामगार, मजूर राहतात. मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्यांना मदत केली आहे. लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक नवनाथ मदने व कर्मचारी यांनी शहरातील विविध भागातील गरजूंना त्यांची भूक भागवण्यासाठी बिस्कीट पुडे, फळे, पिण्याचे पाणी आदींचे वाटप केले.

Web Title: Trained staff to help the trainers in the train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.