प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 09:28 PM2019-05-26T21:28:49+5:302019-05-26T21:29:52+5:30

येवला : येत्या ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्र्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं.

Trainer Ravi Shastri Saibaba's foot | प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

रवी शास्त्री यांना फेटा बांधताना श्रीकांत खंदारे.

Next

येवला : येत्या ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्र्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं.
याप्रसंगी साईबाबांच्या चरणी लावलेला आर्शिवादरूपी फेटा रवी शास्त्री यांना बांधण्याचा मान येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांना लाभला. याप्रसंगी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरु ण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरही, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापक चंद्रकांत गुप्ता, श्रीकांत खंदारे, राजेंद्र भुजबळ हजर होते. साईबाबांच्या आर्शिवादाने भारत संघ लवकरच विश्वकप जिंकून येईल असे सूतोवाच रवी शास्त्री यांनी यावेळी केले.
रवी शास्त्री यांनी मंगळवारी शिर्र्डीत साई बाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. साईबाबांचे भक्त असलेले रवी शास्त्री अनेकदा शिर्र्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला रवी शास्त्री उपस्थित होते. साई दर्शनानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. रवी शास्त्री आणि आर. श्रीधर यांनी साईबाबांचं दर्शन घेऊन भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी साईबाबांकडे प्रार्थना केली.

Web Title: Trainer Ravi Shastri Saibaba's foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी