डाळिंब निर्यातीसाठी प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:27 PM2018-11-20T18:27:12+5:302018-11-20T18:29:08+5:30
सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले.
वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले.
आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डाळिंब पिकांचे व्यवस्थापन, कीड, तेल्या रोगावर नियंत्रण कसे करावे, डाळिंब निर्यातीसाठी काय करावे, याबाबत शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात आले. झाड बळकट असेल तर ते निरोगी फळे
देते. डाळिंब उत्पादन घेताना
त्यात आंतरपिके केवळ वर्गीय पिके नको.
ज्वारी, बाजरी, हरबरा, मका, कांदा यासारखी आंतरपिके आपण घेऊ शकतो. तसेच रासायनिक खतांचा वापर टाळावा. शक्यतो सेंद्रिय खते वापरावीत असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. वाळुंज यांनी दिला. तसेच झाडाला पेस्टिंग करणे गरजेचे आहे.
तेल्या रोग टाळणे शक्य नाही. मात्र, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. झाडाचा मातृ वृक्ष हा निरोगी असावा. मातृ वृक्ष निरोगी असेल तर झाड फळेही दर्जेदार
येईल असे गुंजाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी या प्रशिक्षण मेळाव्यात डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ
डॉ. सचिन हिरे, कृषी प्रक्रिया शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, डाळिंब उत्पादकतज्ज्ञ प्रमोद देशमुख आदी मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन
केले. तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र दोडके, लक्ष्मण मलिक, अनिल नवले,
सचिन खडके यांनी या प्रशिक्षणवर्गाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.