कृषी विभागाकडून शेतकर्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:49 PM2021-06-23T16:49:40+5:302021-06-23T16:51:15+5:30
विंचूर : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शासनाने कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम सुरु केली आहे.
विंचूर : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शासनाने कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेंतर्गत कृषी विभागाने विंचूर नजीक असलेल्या विष्णूनगर येथे शेतकर्यांच्या बांधावर बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया, कृषी विभागाच्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यपद्धती, सुक्ष्म नियोजन आदींचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना करून दाखविले.
शेतक-यांनी सदर मोहीमेचा लाभ घ्यावा. तसेच शेतकर्यांना काही अडचण आल्यास माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे, आवाहन कृषी सहाय्यक संगिता जाधव यांनी केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक एम. बी. जाधव, संतोष घायाळ, किरण घायाळ, अक्षदा घायाळ, विठ्ठल घायाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.