नाशिकमध्ये मिळणार यंत्र मानव बनविण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:46 PM2018-02-12T14:46:17+5:302018-02-12T14:47:38+5:30
नाशिक : येथील रोबोटिक सेंटरच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यंत्र मानव (रोबोटिक) बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भुपेंद्र देव व मुक्ता देव यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये हा पहिलाच प्रयोग असून, त्यात लेगो एज्युकेशन ह्या कंपनीच्या साधनांनी प्रि-नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रोबोटिकचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात रोबोटचे हजारो वेगवेगळे मॉडेल्स व प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुनी पंडीत कॉलनीतील गोपाळ पार्क येथे दि. १४ ते १८ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या प्रशिक्षण कार्यशाळेत मुलांना रोबोट विषयी प्राथमिक माहिती, रोबोट नियंत्रण, रोबोट प्रोग्रामिंग त्याच बरोबर विज्ञान, तंत्रज्ञान व तांत्रिक शिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही देव यांनी केले आहे.