मालेगावी मराठी विषयाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:12 AM2018-04-11T00:12:38+5:302018-04-11T00:12:38+5:30
मालेगाव : इयता दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे.
मालेगाव : इयता दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे. यात मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाचा तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम येथील ए. टी. टी. हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. ए. निकम, शिक्षक मोईन शेख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी निकम म्हणाले की, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक बदलले असून, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातील बारकावे, नवीन मूल्यमापन पद्धती शिक्षकांनी समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मोईन शेख यांनी विद्यार्थ्याला कृतिशील करणारा हा अभ्यासक्रम असून, यामुळे शिक्षकांना मराठी विषय अध्यापनात मदत होईल, असे सांगितले. या प्रशिक्षणातील दोन सत्रात मार्गदर्शक जी. एम अहिरे, जे. जे. निकम, आर. डी. शेवाळे, टी. के. देसले यांनी पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये, पाठांचा परिचय करून दिला.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सरोज देवरे यांनी या प्रशिक्षणातून दहावी मराठी विषयाचा सर्वंकष अभ्यास करणे सोपे होणार असून, विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवणे शक्य होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. आर. वाय. कुरेशी, नीलेश पवार यांच्यासह शहर व तालुक्यातील सुमारे शंभर शाळांचे मराठी विषय शिक्षक उपस्थित होते. यावेळी अनिल वाघ, एस. पी. खैरनार यांनी आभार मानले.