ऑक्सीजन टाकी हाताळणीबाबत आता मनपा अभियंत्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:30 PM2021-04-28T22:30:05+5:302021-04-29T00:47:09+5:30

नाशिक- डॉ झाकीर हुसेन रूग्णालयाच्या परीसरातील ऑक्सीजन टाकीच्या गळतीनंतर महापालिकेला आता आपल्याही उणिवा लक्षात आल्या आहेत. आता ठेकेदार कंपनीच्या मदतीने अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना देखील टाकीच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.

Training of Municipal Engineers on Oxygen Tank Handling | ऑक्सीजन टाकी हाताळणीबाबत आता मनपा अभियंत्यांना प्रशिक्षण

ऑक्सीजन टाकी हाताळणीबाबत आता मनपा अभियंत्यांना प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देऑक्सीजन टाकीबाबत तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण

नाशिक- डॉ झाकीर हुसेन रूग्णालयाच्या परीसरातील ऑक्सीजन टाकीच्या गळतीनंतर महापालिकेला आता आपल्याही उणिवा लक्षात आल्या आहेत. आता ठेकेदार कंपनीच्या मदतीने अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना देखील टाकीच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत.

आयुक्त कैलास जाधव यांनी तसे निर्देश दिले आहे. झाकीर हुसेन रूग्णालयातील टाकीतील ऑक्सीजन गळतीनंतर एकुण २४ जणांचा मृत्यू झाला होता. गळतीच्या वेळी अन्य खासगी ऑक्सीजन पुरवठादार कंपन्यांचे तंत्रज्ञ बोलवून ही टाकी दुरूस्त करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी ऑक्सीजन टाकीबाबत तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण अभियंत्यांना देऊन त्यांना याठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे झाकीर हुसेन रूग्णालय तसेच नाशिकरोड येथील न्यू बिटको रूग्णालयात सध्या दोन ऑक्सीजन टाक्या असून दोन्ही ठिकाणी आणखी तीन तीन केएलच्या दोन टाक्या बसवण्यात येणार आहेत त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून परीसरातील काही वृक्षांचे विस्तार कमी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात देखील आयुक्तांनी उद्यान विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Training of Municipal Engineers on Oxygen Tank Handling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.