नाचलोंढी येथे किशोरी मुलींसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:15 PM2019-03-12T15:15:59+5:302019-03-12T15:16:50+5:30

पेठ -तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत येणार्या कुळवंडी बिटातील नाचलोंढी येथे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण ( सबला) प्रशिक्षण संपन्न झाले.

Training for teen girls at Nachalandi | नाचलोंढी येथे किशोरी मुलींसाठी प्रशिक्षण

नाचलोंढी येथे किशोरी मुलींसाठी प्रशिक्षण

Next

पेठ -तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत येणार्या कुळवंडी बिटातील नाचलोंढी येथे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण ( सबला) प्रशिक्षण संपन्न झाले. या दहा दिवशीय चाललेल्या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्रात्रेय मुंढे,बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कव्हळे, सरपंच केशव बोरसे,पर्यवेक्षिका उत्तरा कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित किशोरवयीन मुलीं तसेच अंगणवाडी कार्यकर्तीनी काढलेली आकर्षक प्रवेशद्वारातील रांगोळीने मान्यवरांचे मन वेधून घेतले.तसेच किशोरवयीन मुलींनी मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने केले. पर्यवेक्षिका उत्तरा कुमावत यांनी प्रास्ताविकातून किशोरवयीन मुलींच्या (सबला) सक्षमीकरण प्रशिक्षणाचे ध्येय आणि उद्धिष्ट घेण्याचे विषद केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंढे यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण आणि बौद्धिक क्षमता यांवर सखोल मार्गदर्शन केले. शासनाच्या बेटी- बचाव,बेटी पढाव सारख्या उपक्र मातून पेठ सारख्या आदिवासी बहुल भागातून मुलींना स्वत:च्या पायावर आणि उद्याच्या कुटुंबीचाही जबाबदारी पेलविण्यासाठी सक्षमीकरण महत्वाचे असून काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Web Title: Training for teen girls at Nachalandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक