मुंबईकडे जाणाºया गाड्यांना अजूनही ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:20 AM2017-09-02T00:20:42+5:302017-09-02T00:20:51+5:30
गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.
नाशिक : गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यापासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शुक्रवारीही पंचवटी वगळता इतर गाड्या मुंबईला पोहचू शकल्या नाहीत. यामुळे मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, भुसावळ स्थानकात रेल रोको करीत प्रवाशांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.
गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर तिसºया दिवशीही मुंबईकडे जाणाºया गाड्या या नाशिकरोड, मनमाड आणि भुसावळपर्यंतच चालविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहने तसेच बसचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे, तर चाकरमान्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. नाशिकहून मुंबईला जाणाºया पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या गाड्यांपैकी केवळ पंचवटी एक्स्प्रेसच मुंबईला पोहचत असून, सदर गाडीही तीन तास उशिराने धावत आहे. शुक्रवारीही पंचवटी एक्स्प्रेस वगळता इतर गाड्या मुंबईकडे जाऊ शकल्या नाहीत. मुंबईकडून येणाºया गाड्याही सुमारे दोन तास विलंबाने धावत असून, सकाळपासून एकच गाडी मुंबईहून नाशिकला आली. गेल्या बुधवारी साडेसहा वाजेच्या सुमारा आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन दिवसांनंतरही या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नाही. अपघातानंतर सात तासांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात होते. परंतु ही डेडलाइन टळल्यानंतर दोनदा पुन्हा नव्याने वेळ देण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंतही या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकलेली नव्हती. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन पदरी व्यवस्था असल्याने आणि एका लाइनवरही अपघातग्रस्त रेल्वे दूर करण्याचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने सध्यातरी एकेरी वाहतूक सुरू आहे. डोंगराचा भाग आणि दुपदरी लाइन असल्यामुळे तसेच रस्तामार्गेही जवळ नसल्याने मदतकार्य आणि दुरुस्तीला विलंब होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.