ग्रामीण भागात व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 01:58 PM2020-03-23T13:58:22+5:302020-03-23T13:58:52+5:30
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांनी जनता कला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने प्रशासनाने जमाबंदी आदेश लागू केल्याने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात लॉक डाऊन झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.
Next
ठळक मुद्दे नांदूरशिंगोटे : उपबाजार आवार सुरु तुरळक वाहने वगळता नाशिक-पुणे महामार्गावर सामसूम पाहयाला मिळाली.
लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे शहरा बरोबरच ग्रामीण भागातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणा्नयिांनाच घराबाहेर पडण्याची
परवानगी आहे. येथील स्थानिक पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने बंद ठेवण्याचा सुचना केल्या होत्या. उपबाजार आवार सुरु असला तरी परिसरात सामसूम दिसून आली.