नांदूरैवद्य येथे १४ दिवसांसाठी व्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 01:40 PM2020-07-09T13:40:14+5:302020-07-09T13:40:50+5:30
नांदूरवैद्य : येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याच्या पाशर््वभूमीवर घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशासेविका यांच्यामार्फत तपासणी मोहीम करण्यात येत असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे.

येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख तसेच बेलगाव कुर्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आशासेविका व अंगणवाडी सेविका यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन दुर्धर आजार असलेल्या वृद्ध नागरिकांची थर्मामीटरद्वारे तपासणी करत नोंद केली. कोरोनाविषयी मार्गदर्शन करून जनजागृती करत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता या रोगापासून वाचण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोरोनापासून वाचविण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक हितेश घरटे, आरोग्यसेविका मंगला कणसे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, मोनिका सोनवणे, सुनिता मुसळे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, आशा काजळे यांना जनजागृती करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्या पद्धतीने परिसरातील सर्व आशासेविका यांनी घरोघरी जाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा अशा सूचना यावेळी नागरिकांना घरभेटीप्रसंगी देण्यात आल्या आहेत.