‘समृद्धी’चे व्यवहार सव्वाशे कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:47 AM2017-10-07T01:47:18+5:302017-10-07T01:47:28+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

Transactions of 'Samrudhi' are in 55 crores | ‘समृद्धी’चे व्यवहार सव्वाशे कोटींवर

‘समृद्धी’चे व्यवहार सव्वाशे कोटींवर

Next

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत आपल्या मालकीची जागा थेट खरेदीने देण्यास सुरुवात केली असून, आत्तापर्यंत जमीनमालक शेतकºयांना जागेचा मोबदल्यात सव्वाशे कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने जानेवारी महिन्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू करण्याचे निश्चित केले असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर यंत्रणा जोमाने कामाला लागली असून, जागामालक शेतकºयांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत जवळपास २६५ शेतकºयांनी १०९.५७ हेक्टर जमीन थेट खरेदीने प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात दिली आहे. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात तीन, तर सिन्नरला ६ शेतकºयांनी खरेदी दिली असून, त्यांना १० कोटी ४४ लाख ४९,७११ रुपये अदा करण्यात आले आहेत. जागेच्या मोबदल्यापोटी दिली जाणारी रक्कम थेट शेतकºयाच्या बॅँक खात्यात जमा केली जात आहे. आत्तापर्यंत १२५ कोटी ३८ लाख रुपये शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाची बांधणी नियोजित वेळेतच म्हणजेच २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, या कामाच्या बांधकामाची निविदा तयार करण्यासाठी आंतरराष्टÑीय पातळीवरील कंपन्यांना पूर्व तयारीचा भाग म्हणून चर्चेसाठी बोलविण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या कामाची गुणवत्ता, दर्जा व मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी आंतरराष्टÑीय कंपन्यांनाही निविदेत सहभाग घेता येईल त्या दृष्टीने निविदेतील अटी, शर्तींचा समावेश असेल.

Web Title: Transactions of 'Samrudhi' are in 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.