खांदेपालटावर शिक्कामोर्तब १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: February 10, 2015 01:21 AM2015-02-10T01:21:23+5:302015-02-10T01:23:24+5:30
खांदेपालटावर शिक्कामोर्तब १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या
नाशिक : जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढण्यात आले असून, आठ कक्ष अधिकारी व सहा कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. अंतर्गत खांदेपालटामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने एकूण २३ कक्ष अधिकारी कार्यालयीन अधीक्षकांची माहिती पाठविली होती. त्यातील १४ अधिकाऱ्यांचे अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. बदल करण्यात आलेल्या कक्ष अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे - क ंसात बदलीनंतरचे ठिकाण- आरोग्य -रवींद्र आंधळे (प्राथमिक शिक्षणाधिकारी), कृषी-सुधा जाधव( पशुसंवर्धन विभाग), महिला व बालकल्याण - सदाशिव बारगळ (सामान्य प्रशासन), पंचायत समिती - भानुदास लुटे (महिला व बालकल्याण), पशुसंवर्धन - योगीराज गोसावी (पंचायत समिती), माध्यमिक शिक्षणाधिकारी - जिभाऊ शेवाळे (आरोग्य विभाग), सामान्य प्रशासन - उत्तम चौरे (माध्यमिक शिक्षण), प्राथमिक शिक्षणाधिकारी - अरुण जाधव (कृषी) त्याचप्रमाणे सहा कार्यालयीन अधीक्षकांचेही विभागात अंतर्गत बदल करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे - सामान्य प्रशासन - प्रकाश थेटे (ग्रामपंचायत), आरोग्य - राजेश जाधव (लघुपाटबंधारे पूर्व) ग्रामपंचायत- रणजित पगारे (सामान्य प्रशासन), लघुपाटबंधारे पूर्व - ललिता जाधव (आरोग्य) आरोग्य- देवीदास जोपळे (इवद क्रमांक-१), इवद एक - संजय सोनवणे (आरोग्य) अशा एकूण १४ अधिकाऱ्यांचे अंतर्गत खांदेपालट करण्यात आले आहेत.